MCAच्या डिजिटल यशामध्ये Digi Roisterचा मोलाचा वाटा, मिळाला विशेष सन्मान!

पुणे: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (MCA) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी डिजी रोईस्टर या एजन्सीचा ‘महा वंदन – एमसीए ॲवॉर्ड्स’ सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. गेल्या काही वर्षांत MCAची सोशल मीडिया कम्युनिटी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, आज देशात 9 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय राहणारी ती एकमेव क्रिकेट संघटना ठरली आहे.

डिजी रोईस्टरच्या (Digi Roister) माध्यमातून MCAचे विविध उपक्रम, स्पर्धा आणि घडामोडी सहजतेने चाहत्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत. या उल्लेखनीय योगदानासाठी ‘महा वंदन – एमसीए ॲवॉर्ड्स’ सोहळ्यात Digi Roisterचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी एजन्सीचे प्रमुख शरद बोदगे, चिन्मय रेमणे आणि शिवतेज होडगे उपस्थित होते. MCAच्या डिजिटल प्रवासात मोलाची भर घालणाऱ्या डिजी रोईस्टरच्या (Digi Roister) कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

Comments are closed.