Digital Arrest danger increased Jalgaon and Gondia cases Maharashtra in marathi asj


जळगाव : गेल्या काही काळापासून राज्यात अनेक ठिकाणी डिजिटल अरेस्टच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेकांची यामध्ये कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. डिजिटल अरेस्टचा राज्यात धोका वाढत असून नुकतेच जळगाव आणि गोंदियामध्येही असे काही प्रकार घडल्याचे समोर आले आहे. गोंदियामध्ये एका शिक्षकाची तब्बल 13 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तर, जळगावमध्ये डॉक्टरची तब्बल 31 लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. (Digital Arrest danger increased Jalgaon and Gondia cases Maharashtra)

हेही वाचा : Sanjay Raut : फडणवीसांनी दोन महिन्यात जे कमावले ते…संजय राऊत यांची टीका 

– Advertisement –

समोर आलेल्या माहितीनुसार, जळगावमधील निवृत्तीनगर येथील 58 वर्षीय डॉक्टरसोबत 31 डिसेंबर 2024 ते 9 जानेवारी 2025 या दिवसांमध्ये तीन जणांनी त्यांच्याशी संपर्क साधला. राधिका नावाची एक महिला तसेच राजेश प्रधान आणि मुकेश बॅनर्जी नावाने त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. एक मोबाईल नंबर सांगून तो त्यांच्या नावावर असल्याचे त्यांना यावेळी सांगण्यात आले. तसेच, यावरून त्रास देण्यात येत असून महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. हे आरोप करत त्यांच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून डॉक्टरांना सर्व बनावट कागदपत्रे यावेळी पाठवण्यात आले. तसेच, ‘व्हिडीओ कॉल बंद करून कुठेही जायचे नाही नाहीतर तुम्हाला अटक करण्यात येईल, अशी धमकीदेखील यावेळी देण्यात आली. यावेळी डॉक्टरांकडून तब्बल 31 लाख 56 हजार 64 रुपये ऑनलाइन उकळले गेले. त्यानंतर डॉक्टरांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली . यावेळी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षक भोजलाल लिल्हारे यांची तब्बल 13 लाख 44 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. मुंबईत ठाण्यात तुझ्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून तू डिजिटल अरेस्ट हो, असे सांगत त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्यात आली. आपली फसवणूक करण्यात आली असल्याचे त्यांना कळताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. आरोपीवर नवेगावबांध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे लिल्हारे यांनी स्वतःला तीन दिवस घरामध्येच बंद केले होते. कोणालाही याबद्दल सांगितल्यास तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाला जीवाचा धोका होईल, अशी धमकीदेखील त्यांना देण्यात आली होती. या तीन दिवसांत त्यांच्याकडून तब्बल 13 लाखांची लुट केली.



Source link

Comments are closed.