सीबीआय ऑफिसर बोलतोय…तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येणार; पुण्यातील वृद्धाची 10 कोटी 74 लाख र

पुणे डिजिटल अटक घोटाळा गुन्हे बातम्या: पुण्यातल्या एका ज्येष्ठ नागरिकाला सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून डिजिटल अरेस्ट करण्यात येणार असल्याची भीती दाखवली आणि त्यांची पावणेअकरा कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोघांनीही एटीएम मधून पैसे काढल्यामुळे पोलिसांना या दोघांना पकडण्यात यश आलं आहे. (Pune Digital Arrest Scam Crime News)

आम्ही सीबीआयमधून बोलतोय तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येईल आणि तुमच्या कुटुंबीयांनाही अटक करण्यात येईल, असं सांगून दोघांनी बँक खात्यात तातडीने रक्कम जमा करण्यास सांगितलं. या भीतीपोटी ज्येष्ठ नागरिकांनी 10 कोटी 74 लाख रक्कम या दोघांच्या अकाउंटमध्ये जमा केले. मात्र काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवाजीनगरमधील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संपूर्ण माहिती गोळा केल्यानंतर पोलिसांनी दोघांचा तपास सुरू केला. दोघांनी एटीएममधून पैसे काढल्याचे समजतात पोलिसांनी तपासाचा मार्ग बदलला आणि दोघांनाही एटीएम मध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या व्हिडिओच्या माध्यमातून ओळख पटवून अटक केली आहे. (Pune Digital Arrest Scam Crime News)

डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमके काय? (डिजिटल अटक म्हणजे काय)

डिजिटल अरेस्ट हा कायदेशीर शब्द नाही, तर फसवणुकीची एक नवी पद्धत आहे. असे व्हिडीओ कॉल करणारे भामटे स्वतःला पोलीस अधिकारी, सीबीआय, ईडी अधिकारी, कस्टम्स अधिकारी किंवा न्यायाधीश असल्याचं भासवतात. तुम्हाला डिजिटली अटक करण्यात आलं असून तुम्ही फोन कट करु शकत नसल्याचं सांगत ते भीती घालतात. तुमच्यावर वेगवेगळे आरोप असल्याचं सांगत तुमच्याकडून पैसे उकळतात. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. अशा पद्धतीने व्हिडीओ कॉलवर अटक किंवा ताबा हा बनावट प्रकार आहे, ते बेकायदेशीर असल्याचं त्यामध्ये म्हटलं आहे. अटक ही नेहमी विधिसंमत प्रक्रिया, लेखी आदेश, वॉरंट आणि प्रत्यक्ष ताब्यात घेण्यानेच होते असं I4C च्या सूचनेत स्पष्ट केले आहे.

डिजिटल अटक व्हिडिओ कॉल : असा कॉल आला तर तात्काळ काय कराल?

1. कॉल करा कापून टाका- व्हॉट्सअ‍ॅप, स्काईप, टेलिग्राम व्हिडओ कॉलवर कुणालाही अटक करता येत नाही.

2. काहीही पैसे, OTP, खाते तपशील देऊ नका.

3. नंबर ब्लॉक करा आणि फोनवरील स्क्रीन रेकॉर्ड, स्क्रीनशॉट पुरावा म्हणून ठेवून द्या.

4. ताबडतोब 1930 (राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन) किंवा संख्यावर कॉल करा.

. cybercrime.gov.in पोर्टलवर तक्रार नोंदवा (एनसीआरपी).

6. बँकेला ‘हॉटलिस्ट/होल्ड’ विनंती द्या, UPI किंवा नेटबँकिंग मर्यादा कमी करा.

. स्थानिक पोलिस ठाण्यात पुरावे (कॉल लॉग, स्क्रिनशॉट, ट्रान्झॅक्शन) घेऊन जा.

8. कुटुंबातील व्यक्तींना किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांना सांगा – फसवणूक करणारे 'कोणाशी बोलू नका' असे नेहमी सांगतात. त्यांनी जर असं सांगितलं तर ते फ्रॉड आहेत हे ओळखा.

संबंधित बातमी:

डिजिटल अटक: नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट, एका वृद्धाला 6 कोटींना तर दुसऱ्याला 72 लाखांना लुटलं

आणखी वाचा

Comments are closed.