सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कोर्टात हजर करण्याची धमकी, डिजिटल अरेस्ट करत एकाला 72 लाख तर दुसऱ्याल
डिजिटल अटक: नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या (Digital Arrest) दोन घटना उघडकीस आल्या आहेत. एका घटनेत ज्येष्ठ नागरिकाला 72 लाख रुपयाला तर दुसऱ्या घटनेत तब्बल 6 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई (CJI Bhushan Gawai) यांच्या न्यायालयात हजर करण्याची धमकी देत फसवणूक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या गंगापूररोड भागात लालसरे दाम्पत्य राहत असून त्यांचा मुलगा नोकरी निमित्ताने परदेशात राहत आहे. 74 वर्षीय अनिल लालसरे आणि त्यांच्या पत्नी संध्या हे दोघेच एकमेकांना आधार देत जीवन जगत आहेत. त्यात अनिल लालसरे यांना वृद्धपकाळाने व्याधींनी जडले आहे तर त्याच्या पत्नीला अर्धांगवायूचा झटका आल्यानं दोन-अडीच वर्षांपासून त्या झोपून आहेत. इथेच त्यांना 24 तास ऑक्सिजन आणि इतर औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
Digital Arrest: सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कोर्टात हजर करण्याची धमकी
या कठीण परिस्थितीत आयुष्यभराची पुंजी हाच त्यांचा जगण्याचा मुख्य आधार होता. मात्र अनिल लालसरे सायबर फ्रॉडचा शिकार झाले. अनिल लालसरे यांच्या वृद्धापकाळाचा, भाबडेपणाचा फायदा घेत त्यांना तब्बल 72 लाख रुपयांना हातोहात लुटले. तुमच्या आधार कार्डवरून क्रेडीट कार्ड इश्यू करण्यात आले असून त्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याने तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे. तुम्हाला आता भारताचे सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणी त्यामुळे तुम्हाला 72 लाख रुपयांचा दंड झाला असून रक्कम भरली नाही तर cbi चे पथक अटक करून दिल्लीत घेऊन येईल, असा धमकीच्या फोन करण्यात आला. यामुळे अनिल लालसरे पुरते हादरून गेले. स्वतः व्यवस्थित चालताही येत नसल्याने बँक गाठून RTGS च्या माध्यमातून आरोपींने सांगितलेल्या बँकेच्या खात्यावर त्यांनी पैसे भरून दिले.
Digital Arrest: 6 कोटींचा गंडा
या घटनेला एक महिना उलटून गेला, आज त्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी गेले असता 72 लाख रुपयांचा दंड झाल्याची माहिती दिल्याने या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल होत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आणखी एका वृद्ध व्यक्ती तब्बल 6 कोटी रुपयांना लुटण्यात आले, तुमच्या सिम कार्डच्या माध्यमातून अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असल्याने सरन्यायाधीशांच्या कोर्टात हजर करण्यात आल्याचे सांगत डिजिटल अरेस्टची भीती दाखवित 6 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.
Cyber Fraud: सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये वाढ
दरम्यान, माहिती तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच त्याचे दुष्परिणामही समोर येत आहेत. ज्यांना तंत्रज्ञान अवगत नाही, असे ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लक्ष केले जात असून एक क्लिकवर लाखो, कोट्यवधी रुपये लुटले जात असल्याने प्रत्येकाने सायबर साक्षर होण्याची गरज तद्द व्यक्त करत असून सतर्क राहण्याच्या तसेच सल्ला देत आहेत. सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात लक्ष होत असून त्यांच्या बँक खात्यात किती रक्कम आहे? याची माहिती सायबर फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना कशी मिळते? याचा छडा लावला तरच यामागील रॅकेट उध्वस्त होईल. अन्यथा असे गुन्हे घडतच जातील, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.