डिजिटल अरेस्ट करून वृद्धेला दीड कोटीचा गंडा

दक्षिण मुंबईत राहणाऱया एका 78 वर्षीय वृद्धेला सायबर भामट्यांनी डिजिटल अटक करत त्यांना दीड कोटीचा गंडा घातला होता. अत्यंत पद्धतशीरपणे फसवणूक करण्यात आली होती. पण दक्षिण सायबर पोलिसांनी अचूक तपास करत या गुह्यातील तिघांना अटक केली. तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
स्मिता मालवणकर (78, नाव बदललेले) यांना अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. समोरच्या व्यक्तीने त्याची ओळख पोलीस अधिकारी सांगून तुमच्या नावाचे कुरियर आले आहे. त्यात तुमचे आधार कार्ड आणि ड्रग्ज असल्याचे स्मिता यांना सांगण्यात आले. तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे घाबरवत भामट्यांनी स्मिता यांना डिजिटल अटक केली. त्यानंतर कारवाई टाळायची असेल तर सांगू तसं करा अशी बतावणी करत सायबर गुन्हेगारांनी त्यांच्याकडून एक कोटी 51 लाख 35 हजार इतकी रक्कम एका बँक खात्यावर घेतली. दरम्यान डिजिटल अटक करून आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच स्मिता यांनी पोलिसांत धाव घेतली.
Comments are closed.