एका फिरकी गोलंदाजासाठी एवढी बोली? दिग्वेश राठीवर DPLमध्ये पैशांचा पाऊस!!
दिल्लीचा स्टार गोलंदाज दिग्वेश राठीने आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी शानदार कामगिरी केली. त्याच्या गूढ फिरकी गोलंदाजीसोबतच तो त्याच्या सेलिब्रेशनमुळेही चर्चेत होता. यामुळे दिग्वेशवर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली होती. गेल्या हंगामात दिल्ली प्रीमियर लीगमधील कामगिरीनंतर दिग्वेश प्रसिद्धीच्या झोतात आला. या डीपीएल (DPL) 2025 च्या लिलावात तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू होता.
दिग्वेश राठीला आयपीएलपेक्षा दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी जास्त मानधन मिळाले आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 30 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केले. आता त्याला डीपीएलमध्ये खेळण्यासाठी 38 लाख रुपये मिळतील. लिलावात साउथ दिल्ली सुपरस्टार्सने त्याला 38 लाख रुपयांना खरेदी केले.
आयपीएल 2025 मध्ये त्याने 13 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आणि 8.50 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली त्यानंतर दिग्वेशची प्रचंड मागणी होती. लिलावादरम्यान, पुरानी दिल्ली 6 ने देखील दिग्वेशला खरेदी करण्याचा प्रयत्न केला, परंतु साउथ दिल्ली संघाने त्यांचा स्टार खेळाडू मिळविण्यात कोणतीही कसर सोडली नाही. दिग्वेशने मे महिन्यात लखनऊकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या गट टप्प्यातील अंतिम सामन्यात आयपीएलमध्ये शेवटचा सामना खेळला होता. दिल्ली प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात त्याने 10 सामन्यांमध्ये 14 बळी घेतले. ज्यात त्याची इकॉनॉमी 8 पेक्षा कमी होती.
लिलावात एकूण 520 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. वेगवान गोलंदाज सिमरजित सिंगला सर्वाधिक बोली लागली. तो सेंट्रल दिल्ली किंग्जकडून 39 लाख रुपयांना खेळेल. गेल्या हंगामात त्याने लीगमध्ये सर्वाधिक बळी घेतले. डावखुरा फलंदाज नितीश राणा (वेस्ट दिल्ली लायन्सकडून 34 लाख रुपये) आणि प्रिन्स यादव (न्यू दिल्ली टायगर्सकडून 33 लाख रुपये) यांच्यात सामील झाला.
Comments are closed.