Digvijay -कामल नाथ त्यांचे मतभेद विसरले आणि एकत्र आले

भोपाळ :

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासोबतचे छायाचित्र शेअर केले. कमलनाथ यांच्यासोबत माझे जवळपास 50 वर्षांचे कौटुंबिक संबंध राहिले आहेत. आमच्या राजकीय जीवनात उतारचढाव येत राहिले आणि हे स्वाभाविक देखील आहे. आमचे सारे राजकीय जीवन काँग्रेसमध्ये राहून विचारसरणीच्या लढाईत एकजूट होत गेले आहे आणि यापुढेही आम्ही लढत राहू. आमच्यामध्ये किरकोळ मतभेद राहिले परंतु कधीच मनभेद झाला नाही. जनतेच्या हिताकरता आम्ही मिळून काँग्रेसच्या नेतृत्वात कार्यरत राहू, असे दिग्विजय यांनी म्हटले आहे. मार्च 2020 मध्ये मध्यप्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळले होते, तेव्हा पक्षातील संघर्ष उफाळून बाहेर आला होता. तसेच कमलनाथ आणि दिग्विजय यांच्यात आरोप-प्रत्यारोपही झाले होते. दिग्विजय आणि कमलनाथ यांनी परस्परांवर सरकार पाडविण्यास जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तर आता दिग्विजय सिंह यांच्या पोस्टमुळे जुना वाद मागे सोडून देत एकजुटतेचे नवे चित्र ते सादर करू पाहत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

 

Comments are closed.