कॉन्सर्टमध्ये खलिस्तान समर्थक झेंडे, कार्यक्रम थांबवून दिलजीत दोसांझने दिले स्पष्टीकरण
कॅनडातील कॅलगरी येथे सुरू असलेल्या ‘ऑरा टूर’दरम्यान पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ यांनी काही प्रेक्षकांकडून खलिस्तान समर्थक झेंडे फडकवल्याचे पाहून आपला कार्यक्रम काही काळ थांबवला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कार्यक्रमादरम्यान परिस्थिती स्पष्ट करताना दोसांझ यांनी पंजाबी समाजातील काही घटकांकडून होत असलेल्या टीकेलाही उत्तर दिले. गेल्या वर्षी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सहभागी होण्यावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली.
दोसांझ म्हणाला की, “माझं काम दानधर्म करणं नाही. पण मी जिथेही जातो, तिथे पंजाबबद्दल बोलतो. राष्ट्रीय माध्यमे पंजाबच्या प्रश्नांवर बोलत नाहीत, असं आपण म्हणतो. म्हणूनच मी त्या कार्यक्रमात गेलो आणि तिथे पंजाबचे मुद्दे मांडले.” त्याने पुढे सांगितले की, त्यांनी आपल्या कमाईतून पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी मदतही केली आहे. “ , लोकांना मदत करण्यासाठीच आपण पैसे देतो. पण जर कुणाला अजूनही माझ्या टीव्हीवरील उपस्थितीबाबत आक्षेप असेल, तर तुम्हाला जितके झेंडे दाखवायचे आहेत ते दाखवा,” असे त्याने स्पष्ट केले.
दिलजीत म्हणाला की, The Tonight Show Starring Jimmy Fallon मध्येही पंजाबचे मुद्दे मांडण्यासाठीच गेलो होते. “मी तिथे चित्रपट किंवा गाण्याच्या प्रमोशनसाठी गेलो नव्हतो, तर पंजाब आणि गुरु नानक जहाज प्रकरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी गेलो,” असे त्याने सांगितले.
दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये Sikhs For Justice (SFJ) या खलिस्तान समर्थक संघटनेने दोसांझच्या ऑस्ट्रेलियातील कॉन्सर्टला विरोध दर्शवला होता. 1 नोव्हेंबर रोजी ‘सिख नरसंहार स्मरण दिना’च्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम “बंद पाडण्याचा” इशाराही देण्यात आला होता.
Comments are closed.