दिनेश कार्तिकचा नवा अध्याय! IPL विजेत्या RCB नंतर आता इंग्लंडमधील संघाला देणार फलंदाजीचे धडे

टीम इंडियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक चढ-उतारांचा सामना करत वेळोवेळी आपल्या फलंदाजीची धार दाखवून दिली आहे. आयपीएलमध्येही त्याने दमदार कामगिरी गेली आहे. 1 जून 2024 रोजी त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आणि प्रशिक्षकाच्या रुपात आपला नवा प्रवास सुरू केला. आयपीएल 2025 विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याने भुमिका पार पाडली. आता इंग्लंडमध्ये तो लंडन स्पिरिट या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक जिम्मेदारी पार पाडणार आहे.

The Hundred 2026 च्या आगामी हंगामासाठी सर्व संघांनी कंबर कसून सरावाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभुमीवर लंडन स्पिरिट या संघाने दिनेश कार्तिकीची मेंटॉर आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. द हंड्रेड या स्पर्धेत दिनेश कार्तिक पहिल्यांदाच प्रशिक्षक पदाच्या भुमिकेत दिसणार आहे. लंडन स्पिरिट संघाचे संचालक मो बोबाट यांनी दिनेश कार्तिकचे स्वागत केले आहे. तसेच त्याची भुमिका संघासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असंही ते म्हणाले आहेत. शॉर्ट फॉर्मेट आणि लिग फ्रेंचाइजी क्रिकेटसाठी दिनेश कार्तिकचा अनुभव आमच्यासाठी अमूल्य असेल, अशा भावना मो बोबाट यांनी व्यक्त केल्या. मो बोबाट RCB संघाचे क्रिकेट संचालक म्हणूनही काम पाहत आहे.

दिनेश कार्तिकने आपल्या कारकिर्दीमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये हिंदुस्थानी संघाचे प्रतिनिधीत्व केले आणि 180 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तसेच IPL मध्येही त्याने 257 सामने खेळले आहेत. तसेच अनेक महत्तवपूर्ण सामन्यांमध्ये संघाला जिंकूण देण्यात त्याने मोलाची कामगिरी पार पाडली आहे.

Comments are closed.