दिनेश कार्तिक- आर अश्विन सोबत ‘या’ स्पर्धेत मैदानावर परतणार! जाणून घ्या सविस्तर

टीम इंडियाचा माजी खेळाडू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) एकदा पुन्हा मैदानावर परतण्यासाठी तयार आहे. खास गोष्ट म्हणजे, कार्तिकला टीम इंडियाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. कार्तिकसोबत आर. अश्विनही मैदानावर झळकताना दिसणार. हे दोघे हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत भारतीय टीमसाठी दमदार प्रदर्शन करताना दिसणार आहेत.

हाँगकाँग क्रिकेटने आपल्या अधिकृत अकाऊंटवर कार्तिकला भारतीय संघाचं कर्णधार पद दिल्याची घोषणा केली आहे. कार्तिकने 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तर, अश्विनने ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान अचानक निवृत्ती जाहीर केली होती.

दिनेश कार्तिक एकदा पुन्हा मैदानावर चौकार-षटकार मारताना दिसणार आहे. कार्तिक हाँगकाँग सिक्सेस 2025 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल. कार्तिकने आपल्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात फलंदाजीमध्ये जोरदार कामगिरी केली होती. विशेषतः RCBकडून IPLमध्ये त्याने आपली शानदार खेळी दाखवून चाहत्यांचे मन जिंकले. यामुळेच या स्पर्धेमध्ये आता तो बॅट हातात घेऊन तसेच संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे.

आर. अश्विन कार्तिकच्या नेतृत्वात आपल्या गोलंदाजीने फलंदाजांची विकेट घेईल. अश्विनने आपल्या करिअरमध्ये जगभरातील फलंदाजांना आपल्या स्पिनच्या जाळ्यात अडकवले आहे. त्याने अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना यश प्राप्त केले आहे. आता हे पाहणे मनोरंजक ठरेल की, या नवीन फॉरमॅटच्या स्पर्धेत अश्विन-कार्तिकची जोडी कशी कामगिरी करेल.

Comments are closed.