कसोटी निवृत्तीनंतर विराट सर्वात आनंदी माणूस

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याचा अवघ्या क्रिकेटविश्वाला धक्का बसला असेल, पण सध्या तो सर्वात आनंदी माणूस आहे. तो आपल्या निर्णयापासून आनंदीच नाही तर तो चांगल्या मानसिक स्थितीत असल्याचा खुलासा बंगळुरूचा फलंदाजी कोच दिनेश कार्तिकने केला आहे. ब्रेकनंतर पुन्हा आयपीएल सुरू झाल्यानंतर बंगळुरूला विराटला सामना खेळायचा होता आणि त्या सामन्याला त्याच्या कारकीर्दीला मानाचा मुजरा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने चाहते जमा झाले होते. मात्र हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आज सामन्यापूर्वी कार्तिकने विराटबद्दल आपली भावना व्यक्त केली, तो म्हणाला, जरी विराटच्या निर्णयाचे धक्के बाहेरील विश्वाला बसले असले तरी सध्या विराट कसा आहे ते आम्ही पाहतोय. तो फक्त क्रिकेटचा आनंद लुटतोय, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. निवृत्तीचा निर्णय हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो, असेही तो म्हणाला.
Comments are closed.