लोकलच्या दिव्यांग डब्यातच पोलिओग्रस्त प्रवाशाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मुंबई लोकल ट्रेनमधील दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव डब्यात एका पोलिओग्रस्त व्यक्तीवर 5 ते 6 जणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
ही घटना 28 मार्च रोजी दुपारी सुमारे 2:45 वाजता सीएसएमटी–कर्जत फास्ट लोकलमध्ये घडल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्ती दोन्ही पायांनी पोलिओग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार दिव्यांगांसाठी राखीव सहाव्या डब्यात घडला.
व्हिडिओमध्ये काही पुरुष, महिला तसेच एक लहान मुलगा देखील पीडित व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. आरोपींनी हातांनी तसेच लाथाबुक्क्यांनी त्या व्यक्तीवर हल्ला केल्याचे स्पष्ट दिसते.
मध्य रेल्वेच्या ठाणे लोकलमध्ये दिव्यांगाच्या डब्यात एका अपंग व्यक्तीला काही लोकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. pic.twitter.com/UzL3F8qdjC
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 29 मार्च 2026
या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून मुंबई लोकलमधील दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
Comments are closed.