संघ बैठकीत शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांवर चर्चा

वृत्तसंस्था/ जोधपूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय समन्वय बैठकीत संघाने आपल्या शताब्दी वर्षासाठी आखलेल्या कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा केली आहे तसेच महिलांचे प्रश्न, शेती, सहकार्य, व्यसनमुक्ती आणि सामाजिक उपक्रमांच्या बाबतीत संलग्न संघटनांच्या कार्याचा आढावा घेतला आहे, असे सांगितले. पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय समन्वय बैठकीच्या पहिल्या दोन दिवसांत विजयादशमी 2025 ते विजयादशमी 2026 पर्यंत होणाऱ्या संघाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध संलग्न संघटनांनी त्यांच्या उपक्रमांची आणि भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली.

Comments are closed.