RLOA बैठकीत विकासावर चर्चा
अटलबिहारी वाजपेयी यांच्या शताब्दीनिमित्त बैठक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने बुधवारी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांच्या निवासस्थानी आयोजित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत विकासाच्या मुद्द्यावर विचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आघाडीतील सर्व पक्ष एकोप्याने देशाच्या विकासामध्ये योगदान करणार आहेत, असे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. या बैठकीला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्व घटक उपस्थित होते. बैठकीत अनेक राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या बैठकीला आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, संयुक्त जनता दलाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग, अपना दल (एस) या पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल, राष्ट्रीय लोकमोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह, भारत धर्म जनसेना पक्षाचे तुषार वेल्लापल्ली, हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी आदी नेते उपस्थित होते. या बैठकीची कार्यक्रमपत्रिका अधिकृतरित्या ठरलेली नव्हती. मात्र, सूत्रांच्या म्हणण्यानुसार बैठकीत सुशासन आणि काही महत्वाच्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताचे युती सरकार पूर्णवेळ चालवून दाखविले होते. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दीचे निमित्त साधून ही बैठक घेण्यात आली, असे स्पष्ट पेले गेले आहे.
नड्डा यांच्याकडून माहिती
या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांनी नंतर दिली. विकसित भारताच्या संकल्पनेला रालोआतील सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असून आघाडीतले सर्व पक्ष या संकल्पनेशी घट्टपणे बांधील आहेत. उत्तर प्रदेशातील निषाद पक्षाचे नेते संजय निषाद यांनीही नंतर पत्रकारांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्रिपणे विकासाच्या दिशेने पुढे वाटचाल करण्याचा निर्धार केला आहे. याच निर्धाराचा
Comments are closed.