शुबमन गिल आणि गौतम गंभीरमध्ये वाद? सुनील गावसकर यांचं ते वक्तव्य चर्चेत!
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जात आहे. या चारही सामन्यांमध्ये भारताच्या डावखुऱ्या फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देण्यात आलेली नाही. यावर भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी सोनी स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले की, संघ निवडण्याचा हक्क हा कर्णधाराचा असतो, मुख्य प्रशिक्षक किंवा इतर कोणाचाही यात हस्तक्षेप असू नये. गावसकर यांनी हेही म्हटले की, संघात सगळं काही सुरळीत आहे असं दाखवण्यासाठी असे निर्णय घेतले जातात.
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी सोनी स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले की, “कदाचित शुबमन गिल शार्दूल ठाकूरला संघात घ्यायचा इच्छुक नव्हता, आणि त्याऐवजी कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करू इच्छित होता. शेवटी ही कर्णधाराची टीम असते.” इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रूटला कुलदीप यादवने 2018 मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तीन चेंडूंमध्ये दोनदा बाद केलं होतं, तरीही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जात नाहीये.
सुनील गावसकर यांचं मत आहे की कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली पाहिजे. गावसकर म्हणाले की, लोक शुबमन गिलबद्दल आणि त्याच्या कर्णधारपदाबद्दल चर्चा करतील, त्यामुळे त्याला संघात हवे असलेले खेळाडू मिळाले पाहिजेत. पुढे गावसकर म्हणाले की, आमच्याकडे तर कोचसुद्धा नव्हते, फक्त माजी खेळाडू, मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर असायचे. आम्हीही त्यांच्याशी वेळ मिळेल तेव्हा बोलायचो.
सुनील गावसकर यांचं मत आहे की संघातील अंतर्गत मतभेद लपवण्याचा प्रयत्न केला जातो आणि असं दाखवलं जातं की ड्रेसिंग रूममध्ये सगळं काही ठीक आहे. गावसकर म्हणाले की, मला माहिती आहे की संघाच्या आतल्या गोष्टी बाहेर येत नाहीत, पण प्लेइंग इलेव्हनची निवड करणं ही कर्णधाराची जबाबदारी असते.
Comments are closed.