शिवसेनेकडून गणेशपूजा साहित्याचे वाटप
शिवसेना शाखा क्रमांक 191 च्या वतीने उपनेत्या विशाखा राऊत व शाखाप्रमुख अजित कदम यांच्या सौजन्याने गणपती पूजा साहित्य संचाचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, आमदार महेश सावंत, शाखाप्रमुख प्रवीण नरे, विजय नागवेकर, समीर कदम, अमर गुरव उपस्थित होते.
वडाळा विधानसभेतील शाखा क्र. 178 मधून उपविभाग संघटिका माधुरी विश्वासराव-मांजरेकर यांच्या वतीने गणेश पूजा साहित्य वाटप करण्यात येत आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला. यावेळी शाखा संघटक विशाखा जाधव उपस्थित होत्या.
युवासेना विस्तारक निलेश तुकाराम गवळी व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्या स्नेहा गवळी यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र. 154 च्या घरगुती गणपती पूजा सामग्रीचे अनावरण शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
Comments are closed.