होऊ दे खर्च, धनत्रयोदशीलाच भारतीयांनी तिजोरी उघडली, सोने चांदीसह तब्बल 1 लाख कोटींची खरेदी

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात यंदा मोठी वाढ होऊन देखील भारतीयांचा दागिने खरेदीचा उत्साह मावळलेला नाही. सोने आणि चांदीची विक्रमी खरेदी करत भारतीय ग्राहकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी अंदाजे एक लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजे कॅटनं ही माहिती दिली आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या माहितीनुसार सोने आणि चांदीची एका दिवसातील 60 हजार कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 25 टक्के वाढ झाली आहे. सोन्याचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत 60 टक्क्यांनी वाढून 130000 रुपयांवर पोहोचले आहेत. तरी देखील भारतीय खरेदीदारांचा उत्साह कमी झालेला नाही.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचा विभाग अखिल भारतीय दागिने आणि सुवर्णकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी म्हटलं की, गेल्या दोन दिवसात दागिने  बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफा बाजारात 10000 कोटी रुपयांची विक्री झाली आहे. धनत्रयोदशीचा दिवस सोने, चांदी, भांडी, समृद्धीचं प्रतीक असलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. पाच दिवसांच्या दिवाळीचा हा पहिला दिवस मानला जातो.

चांदीचे दर गेल्या वर्षीच्या 98000 रुपयांवरुन 55 टक्क्यांनी वाढून 180000 रुपयांवर पोहोचले आहेत. तरी देखील ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. सोने चांदी शिवाय भांडी आणि घरगुती उपकरणांच्या विक्रीतून 15000 कोटी, इलेक्ट्रॉनिक्स  आणि विजेच्या उपकरणांच्या विक्रीतून 10 हजार कोटी  आणि सजावटीच्या वस्तू आणि धार्मिक सामग्रीच्या विक्रीतून 3000 कोटी रुपयांची कमाई झाल्याची माहिती आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे महासचिव आणि भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी या वाढीचं श्रेय वस्तू आणि सेवा कराच्या दरातील कपातीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी वस्तूंच्या खरेदीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाला दिलं. भारतीय ग्राहक स्वदेशी उत्पादनाला प्राधान्य देत असल्यानं छोटे व्यापारी, कारागीर आणि उत्पादकांना फायदा होत असल्याचं म्हटलं.

येथे प्रकाशित : 18 ऑक्टोबर 2025 11:21 PM (IST)

Comments are closed.