आज पहिली आंघोळ

दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीचा उत्साह सोमवारी अभ्यंगस्नानच्या दिवशी शिगेला पोहोचणार आहे. अभ्यंगस्नान म्हणजेच पहिली आंघोळ. पहाटे सुगंधी उटणे लावून पहिली आंघोळ करणे आणि नंतर कुटुंबियांसोबत दिवाळी फराळ खाण्याचा पारंपरिक उत्साह प्रत्येक घराघरात दिसणार आहे. प्रत्येक मराठमोळ्या कुटुंबात ‘उठा उठा दिवाळी आली….’ हा उत्साहाचा सूर ऐकायला मिळणार आहे.
Comments are closed.