सोलापुरात डीजेला बंदी कायम!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सोलापुरात साजरा होणाऱया गणेशोत्सव व मिरवणूक यादरम्यान डीजे बंदीच्या निर्णयाला शहरातील सर्व नऊ मध्यवर्ती महामंडळांनी एकमुखी पाठिंबा देत डीजे लावणाऱया मंडळांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे सोलापुरात डीजे बंदच राहणार आहे.

सोलापुरात 14 ते 25 सप्टेंबर यादरम्यान संपन्न होणाऱया गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीस शहरातील नऊ मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी, महापालिका, धर्मादाय उपायुक्त, वीज वितरण कंपनी व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत गणेशोत्सव मंडळांनी उत्सवकाळात व मिरवणुकीत डीजेऐवजी ध्वनिक्षेपक व पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. उत्सवाच्या नावाखाली डीजे लावून हुल्लडबाजी करणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा एम. राजकुमार यांनी दिला. डीजेच्या बंदीला शहरातील सर्व नऊ मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱयांनी एकमुखी पाठिंबा देत डीजे लावणाऱया मंडळांवर कारवाई केल्यास त्यांना सहकार्य करणार नाही, अशी भूमिका घेतली.

या बैठकीत ऍड. रोहन सामा या वकिलांनी डीजे बंदीमुळे त्यावर अवलंबून अनेकांचा रोजगार बंद होणार आहे. आवाजावर निर्बंध लावा, पण डीजेला बंदी घालू नका, अशी भूमिका घेताच अनेक मंडळाच्या पदाधिकाऱयांनी त्यांना विरोध केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी एक अंमलदार नेमण्यात येणार असून, परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे.

Comments are closed.