डीएमके सरकार फॅसिस्ट आहे, असा आरोप थलापथी विजयने करतो
चेन्नई: तमिळ सुपरस्टार थलपति विजय यांनी द्रमुक सरकारवर निशाणा साधत सफाई कर्मचाऱ्यांना मध्यरात्री अटक करण्यात आल्याचा आरोप केला आहे. सफाई कर्मचारी स्वत:च्या अधिकारांसाठी शांततापूर्ण पद्धतीने निदर्शने करत असताना एम.के. स्टॅलिन सरकारने ही क्रूर कारवाई केल्याचा दावा विजय यांनी केला आहे. तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख विजय यांनी स्वत:च्या अधिकारांसाठी शांततापूर्ण मार्गाने लढत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मध्यरात्री अमानवीय आणि अराजक पद्धतीने अटक करण्यासाठी फॅसिस्टवादी द्रमुक सरकारची निंदा करत असल्याचे म्हटले आहे. मद्रास उच्च न्यायालयाकडून धरणे आंदोलन स्थळ रिकामी करविण्याच्या आदेशानंतर ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनचे मुख्यालय रिपन बिल्डिंगबाहेर गुरुवारी सुमारे 900 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या कारवाईदरम्यान काही महिला कर्मचारी बेशुद्ध पडल्या. तर काही जणांना खेचत नेण्यात आल्याने जखमी झाल्याचा आरोप विजय यांनी केला आहे.
Comments are closed.