ईआरओडी पूर्व पोटनिवडणुकीत डीएमके मोठा जिंकतो
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूतील इरोड-पूर्व येथे झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. सत्ताधारी द्रमुकचे (द्रविड मुन्नेत्र कळघम) उमेदवार व्ही. सी. चंद्रकुमार यांनी ही जागा जिंकली आहे. व्ही. सी. चंद्रकुमार यांना 1 लाख 15 हजार 709 मते मिळाली असून त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार एम. के. सीतालक्ष्मी यांचा 91 हजार 558 मतांनी पराभव केला आहे. सीतालक्ष्मी यांना केवळ 24,151 इतकी मते मिळाली. काँग्रेस आमदार ईव्हीकेएस एलांगोवन यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक घ्यावी लागली. तामिळनाडूमध्ये काँग्रेसने द्रमुकसोबत युती करून निवडणूक लढवत ही जागा जिंकली होती.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर द्रमुक उमेदवाराला 7,837 मते मिळाली होती. तर त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी सीतालक्ष्मी यांना 1,081 मते मिळाली. दोघांच्या मतांमधील हा फरक अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिल्याने द्रमुक उमेदवाराचा मोठा विजय झाला आहे. भारतीय जनता पक्षासह इतर विरोधी पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. द्रमुकव्यतिरिक्त फक्त एनटीकेने (नाम तमिलर कच्ची) आपला उमेदवार उतरवला होता. पक्षाने एम. के. सीतालक्ष्मी यांना तिकीट दिले होते. मात्र, या जागेवर अन्य 44 अपक्ष उमेदवारही पोटनिवडणूक लढवत होते. तथापि, कोणत्याही उमेदवाराला व्ही. सी. चंद्रकुमार यांना आव्हान देणे कठीण झाले. बुधवारी या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत 67.97 टक्के मतदान झाले होते.
Comments are closed.