डीएनएस बँकेचे अध्यक्ष ॲड. गणेश धारगळकर आरबीआयच्या विशेष समितीवर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड. गणेश धारगळकर यांची रिझर्व्ह बँकेकडून नागरी सहकारी बँकांसाठीची ‘आदर्श नियमावली’ तयार करणाऱ्या महत्त्वपूर्ण समितीवर निवड करण्यात आली आहे. तब्बल ५० वर्षांनंतर ही समिती पुन्हा गठित करण्यात आली असून देशभरातील केवळ पाच तज्ज्ञांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या नियमावलीची आखणी करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. देशातील सहकारी बँकांच्या प्रशासन, व्यवस्थापन आणि कार्यपद्धतीसंदर्भात भविष्यातील धोरणात्मक दिशा ठरवण्यात या समितीची भूमिका महत्त्वाची मानली जाते. सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील डोंबिवलीकर ॲड. धारगळकर यांच्या दीर्घ अनुभवाची दखल घेत रिझर्व्ह बँकेने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ॲड. गणेश धारगळकर यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी सहकार क्षेत्रात भरीव कार्य केल्यानेच त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे.

Comments are closed.