सूर्यकुमारला हटवू नका; एमएसके प्रसाद यांचा निवड समितीला सल्ला
हिंदुस्थानचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवला सध्यातरी नेतृत्वावरून हटवू नये, असा स्पष्ट सल्ला हिंदुस्थानचे माजी यष्टिरक्षक आणि मुख्य निवड समिती सदस्य एमएसके प्रसाद यांनी दिला आहे. आयपीएल 2026 मध्ये सूर्यकुमारची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसली आणि 13 सामन्यांत त्याने केवळ 270 धावा केल्या असल्या तरी त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने टी-20 विश्वचषक जिंकला याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे प्रसाद म्हणाले. शनिवारी मुंबईत होणाऱया निवड समितीच्या बैठकीत आयर्लंड आणि इंग्लंड मालिकांसाठी संघ निवडला जाणार असून सूर्यकुमारच्या भवितव्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रसाद यांनी अक्षर पटेलसारख्या किंवा इतर युवा खेळाडूंना उपकर्णधारपद देऊन भविष्यातील नेतृत्व घडवण्याचा सल्ला दिला.
Comments are closed.