डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरससेवक रमेश म्हात्रेला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Dombivli Doctor assault case : शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी डोंबिवलीच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. काल या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी रमेश म्हात्रेसह इतर सर्व आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे यानंतर या घटनेसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर झाला आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.
डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी रमेश म्हात्रे याची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पोलिस कोठडी देण्याबाबतची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचा विनंती अर्ज पोलिसांनी गुरुवारी कल्याण न्यायालयात दाखल केला होता. परंतु न्या. के. एस. कातकडे यांनी आधी आरोपीला प्रत्यक्ष हजर करा, मगच निर्णय देऊ, असे सुनावत पोलिसांचा अर्ज फेटाळून लावला होता. तेव्हा रमेश म्हात्रेला कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यात आले आणि रमेश म्हात्रेसह चौघांना न्यायालयाने आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर काल त्याला हजर केल्यावर त्या सर्व आरोपींना 10 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर म्हात्रे यांनी कल्याण न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
कल्याण न्यायालयात सरकारी वकील आणि आरोपींचे वकील यांच्यात युक्तिवाद झाला. या युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी सांगितले की, दाखल गुन्ह्यांपैकी एक गुन्हा बाकी आहे. त्या प्रकरणात 10/15 आरोपी आहेत. आमचा अशीलला जामीन मंजूर केला असा युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की आरोपीला जामीन मंजूर झाला तर तो बाहेर प्रेशर करून फिर्यादीला अडचण निर्माण करू शकतो. या सर्व गोष्टींचा विचार करून न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. त्यात आरोपीच्या वकिलाने मेडिकलचा आधार घेतला होता. गोळीबार प्रकरणात आरोपीला एक किडनी नाही. त्याच सोबत असलेल्या आरोपींचा जामीन अर्ज दाखल केला नसल्याने त्यांना पुढे जामीन मंजूर होईल की नाही हे न्यायालय ठरवणार असल्याचे आरोपींच्या वकिलांनी सांगितले आहे.
डॉक्टरांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर तणाव वाढला होता. एका महिला डॉक्टरसह नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा या चौघांवर आरोप आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांना अटक केली. मारहाणीचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेल्या या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आधी तिघांना अटक केली. मात्र, विरोधकांनी संताप व्यक्त केल्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रेलाही अटक करण्यात आली.
रमेश म्हात्रेवर हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल
डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण करणारे शिंदे गटाचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रे याचा भूतकाळ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ज्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर रमेश सुकऱ्या म्हात्रे (Ramesh Mhatre) याने हल्ला केला आहे, त्याच वैद्यकीय क्षेत्राने म्हात्रेला दोनदा जीवदान दिले होते. होय, तुम्ही बरोबर ऐकताय! हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले ‘बाहुबली’ राजकारणी रमेश म्हात्रे याच्यावर 2008 मध्ये जीवघेणा गोळीबार झाला होता. त्या वेळी शर्टच्या खिशातील पेनाने गोळी अडवली, पण ती पोटात घुसली. मृत्यूशी झुंज देत असताना डोंबिवलीच्या एका खाजगी रुग्णालयातील डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून म्हात्रेंचे प्राण वाचवले होते. इतकंच नाही, तर त्याआधी झालेल्या एका हल्ल्यात म्हात्रेची किडनी निकामी झाली असताना, याच डॉक्टरांनी त्यांची एक किडनी काढून त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते. डॉक्टर शिरोडकरांना समोर पाहिल्यावर ‘बाहुबली’ म्हात्रे कृतज्ञतेपोटी थेट पाया पडायचे. मात्र, आज त्याच डॉक्टरांच्या सहकाऱ्यांवर हात उचलल्याच्या घटनेने म्हात्रे तुरुंगाच्या उंबरठ्यावर आहेत.
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Comments are closed.