मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात होणार दस्त नोंदणी, महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय; क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द

मुंबई व उपनगरातील नागरिक, व्यावसायिक व कंपनी मालक आपल्या क्षेत्रासहित मुंबईतील कोणत्याही सहा मुद्रांक कार्यालयांत दस्त नोंदणी करू शकणार आहेत. रहिवास किंवा व्यवसाय असेल त्याच क्षेत्रातील मुद्रांक कार्यालयात नोंदणी करण्याची अट काढून टाकण्यात आली आहे.

आता मुंबई शहर व उपनगरातील नागरिकांना कोणत्याही मुद्रांक कार्यालयात म्हणजे बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर तसेच ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी (अंमलबजावणी एक व दोन) या सहा कार्यालयांत मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्क पत्र याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. या सुधारणेमुळे मुंबईकरांचा वेळ, धावपळ वाचणार असून निर्णय प्रक्रिया व कार्यालयीन कामकाज जलद होईल, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Comments are closed.