ट्रेंड – एक बाहुले झाले माकडाच्या पिलाची आई…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सोशल मीडियावर एका व्हिडीओची प्रचंड चर्चा आहे. हा व्हिडीओ आहे ‘पंच’ नावाच्या एका माकडाच्या पिलाचा. जपानमधील एका प्राणीसंग्रहालयात माकडाच्या कळपात जन्मलेल्या पंच याला त्याच्या आईने स्वीकारले नाही. त्यामुळे आईच्या मायेपासून वंचित असलेला पंच याला प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याची अवस्था समजून त्याला एक मोठे माकडाचे सॉफ्ट टॉय दिले. पंच याने त्याच्या भावविश्वात या खेळण्यालाच आईचे स्थान दिले. तो या खेळण्यासोबतच बिलगलेला असतो. थोडा मोठा झाल्यावर त्याला कर्मचाऱ्यांनी माकडांच्या कळपात सोडले. पण, त्यांनी त्याला हुसपून लावले. त्यामुळे घाबरलेला पंच पुन्हा त्या खेळण्याला बिलगला. मात्र, आता कर्मचाऱ्यांनी एक चांगली बातमी दिली आहे. ती म्हणजे, कळपाने अखेर त्याला स्विकारले आहे.

Comments are closed.