श्री वल्ली महिला संस्था अन् फेरीवाल्या महिलांमध्ये राडा; फेरीवाल्या महिलानी स्वतःच्या अंगावर ओत
डोम्बिव्हली क्राइम न्यूज डोम्बिवली: डोंबिवलीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. श्री वल्ली महिला संस्था आणि फेरीवाल्या महिलांमध्ये जोरदार राडा (Dombivali Crime News) झाला. यादम्यान, फेरीवाल्या महिलेने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतले. केडीएमसी आणि विष्णू नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
डोंबिवली पश्चिमेकडील घनश्याम गुप्ते रोडवर महिला संस्था आणि फेरीवाल्यांमध्ये स्टॉलवरून राडा झाल्याचं पाहायला मिळालं. श्री वल्ली महिला संस्थेला केडीएमसीकडून दिवाळीनिमित्त स्टॉलला परवानगी देण्यात आली होती. महिला संस्थेच्या महिला घनश्याम गुप्त रोडवर स्टॉल लावण्यासाठी गेल्या असता तेथील फेरीवाल्या महिलांनी महिला संस्थेला विरोध करत वाद घातला. आक्रमक झालेल्या महिला फेरीवाल्यांनी चक्क स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले फेरीवाल्या महिलेच्या कडेवर लहान मुलाच्या अंगावर देखील हे डिझेल पडलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या घटनेची माहिती मिळतात केडीएमसी अधिकारी आणि विष्णुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र या घटनेमुळे डोंबिवली परिसरातील फेरीवाल्यांचे मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे.
फेरीवाल्या महिलांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतलं- (Dombivali News)
डोंबिवली पश्चिमेकडील घनश्याम गुप्ते रोडवर श्री वल्ली महिला संस्थेला दिवाळीनिमित्त केडीएमसीने स्टॉल लावण्यात परवानगी दिली. आज या महिला त्या ठिकाणी स्टॉल लावण्यात गेला असता त्या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्या महिलांनी जोरदार विरोध केला. त्यांच्याशी वाद घातला हा वाद इतका विकोपाला गेला की या फेरीवाल्या महिलांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतलं. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच केडीएमसीचे अधिकारी विशुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फेरीवाल्या महिलांचे समजूत काढत मध्यस्थी करत हा वाद मिटवला. ज्या महिलांनी अंगावर डिझेल ओतून घेतलं होतं, त्या महिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेले.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
ही बातमीही वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.