डोंबिवलीत डॉक्टरचे नर्ससोबत प्रेमसंबंध, 10 बिअर अन् 45 झोपेच्या गोळ्या खाऊन आयुष्य संपवण्याचा प

डोंबिवली: डोंबिवलीमध्ये एका नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १० बिअर पिऊन (Dombivli Crime Crime) आणि ४५ झोपेच्या गोळ्या खाऊन या डॉक्टरने आत्महत्येचा (Dombivli Crime) प्रयत्न केला. एका नर्ससोबत प्रेमसंबंध असल्याने नर्स वारंवार लग्नासाठी तगादा लावत असल्याने डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवली विष्णूनगर पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.(Dombivli Crime)

डॉक्टरने टोकाचं पाऊल उचलत आधी १० बिअर आणि नंतर ४५ झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो वाचला पण या घटनेमुळे डोंबिवलीतील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. आत्महत्येचा प्रयत्न (Dombivli Crime Crime) करणाऱ्या डॉक्टरची पत्नी देखील डोंबिवली शहरातील एक नामांकित डॉक्टर आहे.(Dombivli Crime)

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या डॉक्टरचे एका नर्ससोबत प्रेमसंबंध होते. संबंधित नर्स डॉक्टरकडे वारंवार लग्नासाठी तगादा लावत होती. त्यामुळे डॉक्टर मानसिक तणावाखाली गेला होता. यानंतरच डॉक्टरने १० बिअर पिऊन आणि ४५ झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. संबंधित प्रकरणाचा तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत. प्रेमसंबंधांतून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. डॉक्टरवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.(Dombivli Crime)

तर मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील एका नर्ससोबत प्रेमसंबंधामुळे संबंधित डॉक्टर काही काळापासून दुसऱ्या घरात स्वतंत्र राहत होते. त्याच ठिकाणी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर पोलिस स्टेशन हद्दीतील हे नामांकित रुग्णालय असून पती-पत्नी दोघेही डॉक्टर मिळून ते चालवतात. संबंधित डॉक्टर रुग्णालयात हजर न राहिल्याने त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचारी त्यांच्या निवासस्थानी गेले. दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.(Dombivli Crime)

पोलीस सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर आणि परिचारिका यांच्यातील संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. त्यातूनच डॉक्टर डोंबिवली पूर्वेतील एका उच्चभ्रू सोसायटीत राहू लागले. दरम्यान, संबंधित परिचारिकेने लग्नासाठी दबाव आणल्याचे समजते. डॉक्टर आधीच विवाहित असल्याने त्यांनी नकार दिल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर मानसिक तणावातून डॉक्टरने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करून झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत.(Dombivli Crime)

आणखी वाचा

Comments are closed.