घरगुती गॅसच्या दरात वाढ, मध्यमवर्गीयांना महागाईचा धक्का

बंदोबस्त.

दिल्लीत 14.2 किलोचा एलपीजी गॅस आता 913 रुपयांना मिळणार आहे. पूर्वी तो 853 रुपये होता. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये 115 रुपयांची वाढ झाली आहे. ते आता 1883 रुपयांना मिळणार आहे. वाढलेल्या किमती 7 मार्चपासून लागू झाल्या आहेत.

यापूर्वी 8 एप्रिल 2025 रोजी सरकारने घरगुती सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ केली होती. म्हणजेच जवळपास वर्षभरानंतर ही वाढ करण्यात आली आहे. तर 1 मार्च 2026 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 31 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे देशात गॅस टंचाई निर्माण होण्याची भीती असताना सरकारने गॅसच्या किमतीत वाढ केली आहे.

यासोबतच 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही 115 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, याचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि छोट्या व्यवसायांवर होणार आहे. याचा भार मध्यमवर्गीय सर्वसामान्य नागरिकांवर पडणार आहे. सरकारने दोन्ही वाढ मागे घ्याव्यात, त्याचा परिणाम जनतेवर होईल.

Comments are closed.