किडनी विक्री प्रकरणात देशांतर्गत रॅकेट उघड, चंद्रपूर पोलिसांना मोठ यश

किडनी विक्री प्रकरणात चंद्रपूर पोलिसांना मोठं यश आले आहे. किडनी प्रत्यारोपण प्रकरणाचे देशांतर्गत जाळे उघड झाले असून तामिळनाडू राज्यातील त्रिची शहरातील स्टार किम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजरत्नम गोविदनस्वामी व दिल्ली येथील डॉ. रवींद्रपाल सिंग यांनी आपल्या रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे..किडनी घेणाऱ्या व्यक्तीकडून 50 ते 80 लाख रुपये घेतले जात असल्याचे उघड तर किडणी देणाऱ्या व्यक्तीला फक्त 5 ते 8 लाख मिळत असल्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सांगितले आहे..

Comments are closed.