Donald Trump Nobel Peace Prize – अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना ‘नोबेल’ मिळालं!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कार मिळण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प अनेकदा आपल्याला नोबेल शांतता पुरस्कार मिळावा असे म्हणताना दिसले. मी आठ युद्ध थांबवली असून मला नोबेल पुरस्कार मिळायला हवा असा दावा त्यांनी केला होता. आता त्यांची ही इच्छा एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने पूर्ण होताना दिसत आहे.

व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आणि नोबेल विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी आपला पुरस्कार ट्रम्प यांना देण्याची घोषणा केली. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये मचाडो आणि ट्रम्प यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर मचाडो यांनी आपल्याला मिळालेला नोबेल शांतता पुरस्कार ट्रम्प यांना भेट दिल्याचे म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनीही याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.