डोनाल्ड ट्रम्प 1 ऑगस्टपासून 100 देशांवर टॅरिफ लावणार, यादीत भारताचं नाव असणार का?

न्यूयॉर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याकडून टॅरिफ म्हणजेच परस्परशुल्क आकारणी धोरणाला 90 दिवसांची सूट दिली होती. ती सूट 9  जुलै रोजी संपणार आहे. ही मुदत संपण्यापूर्वीच अमेरिकेतून मोठी अपडेट आली आहे. ज्यानुसार 1 ऑगस्टपासून जगभरातील 100 देशांतून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर ट्रम्प टॅरिफ लागू केलं जाईल. जे 10 टक्के असेल. अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी याला दुजोरा दिला आहे.

100 देशांवर किमान 10 टक्के टॅरिफ लागणार

स्कॉट बेसेंट यांनी टॅरिफ हा जागतिक व्यापार रणनीतीला व्यापक अशी नवी सुरवात म्हटलं आहे. जे देश अमोरिकेसोबत व्यापार करारासंदर्भात चर्चा करत आहेत त्या देशांसह सर्व देशांवर बेसलाईन टॅरिफ व्यापक रुपात लादण्यात येणार आहे. ब्लूमबर्गला  दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करणार आहेत त्यांच्या बाबत कशा प्रकारचा व्यवहार करायचा यावर विचार करतोय. मला वाटतं की आम्ही जवळपास 100 देशांची यादी करत आहोत, ज्यांच्यावर किमान 10 टक्के परस्परशुल्क म्हणझेच टॅरिफ लागू असेल ते तिथून पुढं वाढू शकतं.

12 देशांवर टॅरिफ बॉम्ब फुटणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 12 देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकणार असल्याची घोषणा सोमवारी केली जाऊ शकते. रिपोर्टसनुसार ट्रम्प यांनी असं म्हटलंय की त्यांनी 12 देशांसाठीच्या व्यापार पत्रावर सही केलेली आहे. या यादीतील देशांनी ते स्वीकारावं किंवा सोडून द्यावं, त्यांना ते पत्र अल्टिमेटमसह सोमवारी पाठवलं जाईल. त्या 12 देशांची नावं मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत.

भारत, जपान आणि यूरोपियन यूनियनचा समावेश

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, न्यूजर्सीला जात असताना एअर फोर्स वनच्या पत्रकारांसोबत बोलताना ट्रम्प यांनी 12 देशांवर टॅरिफ बॉम्ब फोडण्याचे संकेत दिले आहेत. भारत, जपान आणि यूरोपियन यूनियनचा कथितपणे समावेश असू शकतो. 2 एप्रिलला डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली होती. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला 90 दिवसांची सूट दिली होती. ही मुदत 9 जुलै रोजी संपणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 100 देशांवर 10 टक्के बेसलाइन टॅरिफची तयारी केली आहे. याशिवाय 12 देशांवर नवं टॅरिफ लागू करण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प प्रशासनाकडून सांगण्यात आलं की टॅरिफची निर्मिती अमेरिकेच्या निर्यातीसाठी अनुकूल व्यापार अटींच्या वाढीसाठी करण्यात आली आहे.

अमेरिका आणि भारत व्यापार करार  कशामुळं प्रलंबित

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला 26 टक्के टॅरिफच्या प्रवर्गात ठेवलं होतं, त्यावरील स्थगिती 9 जुलै रोजी संपणार आहे. मुदत संपत आली तरी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर समझोता झालेला नाही. टॅरिफमुळं भारताच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत चर्चा वेगवान झाल्या आहेत.दीर्घ काळ चर्चा होऊन देखील कोणत्याही कराराशिवाय भारताचं शिष्टमंडळ परतलं.

अमेरिका भारतावर कृषी आणि डेअरी क्षेत्र खुलं करण्यासाठी दबाव टाकत आहे. तर भारत कापड, चामडे आणि रत्न याबाबतच्या तरतुदीसाठी आग्रही आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.