रशिया-युक्रेन युद्ध महिनाभरासाठी थांबले, ट्रम्प आणि पुतीन यांच्यात तीन तास चर्चा

तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला रशिया आणि युक्रेनमधील रक्तरंजित संघर्ष 30 दिवसांसाठी थांबला. तब्बल तीन तास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा झाली. ऊर्जा आणि पायाभूत सोयी-सुविधा प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. व्हाईट हाऊस आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय क्रेमलिनने याबद्दलची माहिती दिली आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये कैद्यांच्या अदलाबदलीबद्दलही सहमती झाली. ट्रम्प आणि पुतीन यांच्यात युद्धविरामाबद्दल सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सध्याच्या घडीला तरी शांतता प्रस्थापित होईल अशी आशा व्यक्त होत आहे. व्हाईट हाऊसने बैठकीतील चर्चेची माहिती एक्सवरून दिली. दरम्यान रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात तीन वर्षात 10 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. प्रचंड वित्तहानी झाली. त्यामुळे आता हे युद्ध थांबावे आणि दोन्ही देशांमध्ये शांतता नांदावी यादृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे. दरम्यान, काळ्या समुद्रातील जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या प्रस्तावालाही पुतीन यांनी मंजुरी दिली.
Comments are closed.