ट्रम्प यांच्या घरी पुन्हा एकदा ‘लगीनघाई’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी पुन्हा एकदा लगीनघाई दिसून येणार आहे. स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 15 डिसेंबर रोजी ‘व्हाईट हाऊस’मधील ख्रिसमस पार्टीत सांगितले की, त्यांचा सर्वात मोठा मुलगा ज्युनिअर ट्रम्पचा साखरपुडा बेटीना अँडरसन हिच्यासोबत झाला आहे. 47 वर्षीय ट्रम्प ज्युनिअरचा हा तिसरा साखरपुडा आहे. त्यांचा पहिला विवाह 2005 साली वॅनसा हिच्यासोबत झाला. 13 वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. ट्रम्प ज्युनिअरने 2018 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांचा दुसरा साखरपुडा किम्बर्ली गुइलफॉयसोबत झाला होता. मात्र हा साखरपुडा अल्पावधीतच तुटला. त्यानंतर ट्रम्प ज्युनिअरने बेटीना अँडरसन हिला डेट करायला सुरुवात केली. बेटीना एक फॅशन मॉडेल आहे. तिचे वडील हॅरी लॉय अँडरसन ज्युनिअर हे श्रीमंत बँकर होते.

Comments are closed.