अमेरिकेत ट्रम्प यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी ‘श्रीराम’
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी हिंदुस्थानी वंशाचे उद्योगपती श्रीराम कृष्णन यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत त्यांची कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वर व्हाइट हाऊसचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती केली. चेन्नईचे रहिवासी असलेले कृष्णन हे व्यवसायाने इंजिनीअर आहेत. सध्या ते अँड्रीसेन हॉरिविट्झ नावाच्या व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये भागीदार आहेत. श्रीराम कृष्णन यांनी याआधी मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, ट्विटरसारख्या मोठय़ा कंपन्यांत मोठय़ा पदांवर काम केले आहे. श्रीराम कृष्णन यांनीच एलन मस्क यांना ब्लू-टिकच्या बदल्यात पैसे घेण्याचा सल्ला दिला होता. मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर, त्यांच्या नवीन सेटअपमध्ये श्रीराम कृष्णन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्रीराम कृष्णन यांना तंत्रज्ञान आणि क्रिप्टोमध्ये रस आहे. शिवाय त्यांना स्टोरी टेलिंगची आवड आहे.
Comments are closed.