डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, व्यापार युद्धाचं संकट कमी होणार, चीनला मोठा दिलासा?

ट्रम्प दर नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी चीनवर लादलेलं टॅरिफ 80 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून व्यापारावरील आयात शुल्कावरुन वाद वाढले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक टॅरिफ वॉरच्या धोरणाला चीननं देखील प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, चीननं नंतर नरमाईची भूमिका घेत अमेरिकेसोबत चर्चेती तयारी दर्शवली होती. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवरील टॅरिफ 80 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळं दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला व्यापारी तणाव कमी होऊ शकतो.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रथ सोशल अकाऊंटवरुन चीनवर 80 टक्के टॅरिफ योग्य असल्याचं म्हटलं. मात्र, हे स्कॉट बीवर अवलंबून होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रेजरी सचिव स्कॉट बी यांचा उल्लेख केला. जिनेव्हा मध्ये होणाऱ्या एका बैठकीत चीनसोबत ते चर्चा करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक आहे. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेलं व्यापार युद्ध कमी करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल आहे.

चीननं त्यांची बाजार पेठ खुली करावी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की चीननं त्यांचा बाजार अमेरिकेसाठी खुला करावा, हे त्यांच्यासाठी चांगलं असेल. बंद बाजारासोबत आता काम होत नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क 80 टक्के टॅरिफ हे सध्याच्या 145 टक्क्यांपेक्षा कमी आहे. गुरुवारी अमेरिका आणि यूके ट्रेड डील झाली, त्यामधील 10 टक्के वैश्विक टॅरिफ पेक्षा अधिक आहे. चीन अमेरिका हे मोठे व्यापाराचे भागीदार आहेत. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयानुसार 2024 मध्ये अमेरिकेनं चीनला 143.5 अब्ज डॉलर्स किमतीची निर्यात केली. तर, 438.9 अब्ज डॉलर्सची आयात केली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 2 एप्रिलला परस्पर शुल्काची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलला व्यापारी भागीदार देशांसाठी परस्पर शुल्क लावण्याची घोषणा केली होती.  यानंतर चीननं देखील प्रत्युत्तर दिलं होतं. दोन्ही देशांनी एकमेकांवर जोरदार टॅरिफ लादलं. चीननं अमेरिकेवर 125 टक्के आयात शुल्क लादलण्याची घोषणा केली होती. तर, चीननं अमेरिकेवर 145 टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंना  टॅरिफ बाहेर ठेवण्याची घोषणा केली होती.

भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान सोन्याच्या दरात वाढ, चांदीच्या दरात घसरण, तुमच्या शहरात काय आहेत दर?

Stock Market : भारतीय भांडवली बाजार गडगडला; डॉलरच्या तुलनेत रुपया 30 पैशांनी खाली; गुंतवणूकदारांमध्ये चिंता, नेमकं कारण काय?

अधिक पाहा..

Comments are closed.