पाकिस्तान अणुचाचण्या करत आहे; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या ट्ररिफमुळे चर्चेत आहेत. तसेच नायजेरियावर हवाई हल्ला करण्याचे संकेत देत त्यांनी जगाची चिंता वाढवली आहे. आता ट्रम्प यांनी पाकिस्तानबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की पाकिस्तान अणुचाचण्या करत आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की उत्तर कोरिया अणुचाचण्या करत आहे. पाकिस्तान देखील अणुचाचण्या करत आहे. ट्रम्प म्हणाले की इतर देश अणुचाचण्या करतात म्हणून आम्ही देखील चाचण्या करू, असे त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की जगभरातील अनेक देश अणुबॉम्बची चाचणी करत आहेत. पण कोणीही त्याबद्दल बोलत नाहीत. रशिया आणि चीन अणुचाचण्या करत आहेत, पण ते त्याबद्दल बोलत नाहीत. आपण एक मुक्त समाज आहोत. आपण त्याबद्दल बोलतो. आपल्याला त्याबद्दल बोलावे लागेल.अमेरिका आता अणुबॉम्बची चाचणी घेईल. त्यांनी असेही नमूद केले की उत्तर कोरिया आणि पाकिस्तान देखील अणुबॉम्बची चाचणी करत आहेत. ते म्हणाले, ते चाचणी करतात म्हणून आम्ही चाचणी करू आणि इतर चाचणी करतात. आणि निश्चितच उत्तर कोरिया चाचणी करत आहे. पाकिस्तान देखील चाचणी करत आहे, असा दावा त्यांनी केला.
जगात सर्वाधिक अण्वस्त्रे आमच्याकडे आहेत. सर्व देश अणुचाचण्या करत असतील तर त्यामुळे जगाला धोका आहे. त्यामुळे इतर कोणीही याबाबत बोलत नसले तरी आम्ही बोलणार आहोत. अण्वस्त्रांमध्ये अमेरिका सर्वात प्रगत असला तरी अणुचाचण्या घेणे गरजचे आहे. सर्व देश अणुचाचण्या घेत असताना आम्हीही अणुचाचण्या घेणार आहोत. अमेरिकेच्या अणुचाचण्यांचे समर्थन करताना त्यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

Comments are closed.