मला नोबेल द्या नाहीतर जबर टॅरिफ लावू! ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी प्रचंड उतावीळ झाल्याचे समोर आले आहे. आता त्यांनी नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन करून नोबेल पुरस्कार मिळाला नाही तर भरमसाट टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे.

हिंदुस्थान-पाकिस्तान आणि पंबोडियासह अनेक युद्धे थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला असून अलीकडेच इस्रायल, पाकिस्तान आणि पंबोडियासह काही देशांनी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी नामांकित केल्याचेही समोर आले आहे.

नॉर्वेवर 15 टक्के अतिरिक्त कर

अमेरिकेने नॉर्वेतून होणाऱ्या आयातीवर 15 टक्के कर लावण्याची घोषणा केली होती. त्यावर सध्या चर्चा सुरू आहे, परंतु ट्रम्प यांनी विषय टाळत नोबेल द्या नाहीतर आणखी टॅरिफ लादू अशी धमकी दिली आहे. नॉर्वेजियन बिझनेस डेलीने हा खुलासा केला आहे.

Comments are closed.