इराणच्या भीतीने विमान बदलले, ट्रम्प यांची अखेर कबुली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विमानाने नाटो परिषदेला जाण्यासाठी तुर्कस्थानमध्ये इराणच्या भीतीने विमान बदलल्याची जाहीर कबुली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दिली. ज्या विमानाने नाटो परिषदेला जाणार होतो, त्यावर हल्ला होण्याचा सर्वाधिक धोका होता, त्यामुळे दुसऱ्या विमानाने जाण्याचा निर्णय घेतल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

सुरक्षा कारणांमुळे विमानतळावरील केटरिंग ट्रकमधून दुसऱ्या विमानापर्यंत नेण्यात आले. हल्ला झाला असता तर त्याच विमानाला लक्ष्य केले असते. सुरक्षा यंत्रणा जे सांगतात, तेच मी करतो. मला सतत धमक्या मिळत असतात. डोनाल्ड ट्रम्प हे 8 जुलैला नाटो शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अंकारा येथे आले होते. ते तुर्कस्तानात नवीन बोइंग 747-8 विमानाने पोहोचले होते. हे विमान कतारच्या शाही कुटुंबाने अमेरिकेला दिले आहे. नवे विमानदेखील ब्रिटनच्या आरएएफ मिल्डेनहॉल एअरबेसवर जाणार होते. तिथे अमेरिकन सैनिकांना ते दिसले. पण जुन्या विमानात बसल्यानंतर ट्रम्प त्याच विमानाने ब्रिटनला गेले नाहीत.

Comments are closed.