‘माझ्यामुळेच साडे तीन कोटी लोकांचे प्राण वाचले’; ‘ऑपरेशन सिंधूर’बाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. गेल्या वर्षी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य लष्करी संघर्षासह जगातील एकूण आठ युद्धे आपण रोखल्याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला आहे. हिंदुस्थानच्या ‘ऑपरेशन सिंधूर’ (Operation Sindoor) दरम्यान जर अमेरिकेने मध्यस्थी करून युद्धबंदी घडवून आणली नसती, तर सुमारे साडेतीन कोटी लोकांचा मृत्यू झाला असता, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्याला सांगितल्याचे ट्रम्प म्हणाले.
व्हाईट हाऊसमधील आपल्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मला स्वतः सांगितले की, जर मी हस्तक्षेप केला नसता तर साडेतीन कोटी लोक मारले गेले असते’. हिंदुस्थानच्या ‘ऑपरेशन सिंधूर’चा संदर्भ देत ट्रम्प यांनी अमेरिकन प्रशासनाच्या मध्यस्थीमुळेच युद्ध टळल्याचा आणि कोट्यवधी लोकांचा जीव वाचल्याचा दावा केला आहे.
भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरमध्ये 35 दशलक्ष जीव वाचवल्याचा डोनाल्ड ट्रम्पचा दावा | सामना
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये हस्तक्षेप करून 35 दशलक्ष मृत्यू रोखल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. सामना वर अधिक वाचा.
सामना, दैनिक सामना, सामना बातम्या, डोनाल्ड ट्रम्प, ऑपरेशन सिंदूर, भारत पाकिस्तान युद्ध, शेहबाज शरीफ, मराठीतील आंतरराष्ट्रीय बातम्या
Comments are closed.