ट्रम्प यांनीच स्वतःवर हल्ला घडवून आणला का? व्हाइट हाऊस प्रेस सेक्रेटरीच्या वक्तव्याने तर्कवितर्कांना सुरुवात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डिनर हॉलबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांचे एक वक्तव्य चर्चेत आहे. व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरच्या अगदी आधी त्या म्हणाल्या होत्या की, आज रात्री गोळीबार होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर लगेचच गोळीबार सुरू झाला. त्यामुळे त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता का? अशी चर्चा आता सुरू आहे.
व्हाइट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरपूर्वी कॅरोलिन लेविट यांनी केलेले गोळीबार होईल हे वक्तव्य आता चर्चेत आहे. त्यांनी हे वक्तव्य ट्रम्प यांच्या भाषणासंदर्भात केले होते. मात्र, त्यानंतर लगेचच प्रत्यक्ष गोळीबार झाला. यामुळे सोशल मीडियावर घटनेबाबत प्रश्न निर्माण झाले असून त्यांच्या वक्तव्याबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
लेविट फॉक्स न्यूजशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या होत्या की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आज रात्रीचे भाषण ‘क्लासिक’ असेल. त्यांचे भाषण प्रभावी असेल. त्यांनी ‘शॉट्स फायर्ड’ हा शब्दप्रयोग वापरला, ज्याचा अर्थ तीव्र किंवा राजकीय हल्ला असा होतो. पण नंतर, जेव्हा प्रत्यक्षात गोळीबार झाला, तेव्हा त्यांच्या वक्तव्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले गेले.
कॅरोलिन लेविट यांनी मुलाखतीत सांगितले, ट्रम्प पूर्णपणे तयार आहेत. त्यांचे भाषण जबरदस्त असेल. आज रात्री काही गोळीबार होईल, त्यामुळे सर्वांनी ते पाहावे. कॅरोलिन लेविट यांचे विधान व्हायरल होताच, सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या. काही लोकांनी लेविट यांना याची पूर्वकल्पना होती का, असा प्रश्न उपस्थित केला. हा गोळीबार पूर्वनियोजित बनावट कट होता का? अशी शंकाही व्यक्त होत आहे.
काहींनी तर याला राजकीय फायदा मिळवण्याचा कट म्हटले. कार्यक्रमातील गोळीबार राजकीय फायद्यासाठी हेतुपुरस्सर घडवून आणला गेला होता का, यावरही चर्चा झाली. एका युजरने लिहिले की, कॅरोलिन लेविट यांनी सर्वांना सांगितले होते की आज रात्री लक्ष ठेवा कारण डोनाल्ड ट्रम्प तणाव निर्माण करतील आणि गोळीबार होईल. राजकीय फायदा मिळवण्यासाठी हे पूर्वनियोजित होते का? अशी शंकाही व्यक्त होत आहे.
Comments are closed.