ट्रम्प म्हणतात, युद्ध कधी थांबेल, सांगता येत नाही!
संपूर्ण जगाला वेठीस धरणारे इराण युद्ध कधी थांबेल याकडे अख्ख्या जगाच्या नजरा रोखल्या आहेत. मात्र, युद्धाला तोंड फोडणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच युद्ध कधी संपणार यावरून हात वर केले आहेत. युद्ध कधी थांबणार हे मला सांगता येणार नाही. जोपर्यंत आवश्यक आहे तोपर्यंत युद्ध सुरूच राहील, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. इराणवर अवकळा आली आहे, त्यांच्याकडे काहीही शिल्लक उरले नाही. आम्ही त्यांचा आर्थिक कणा मोडून काढला आहे, अशी दर्पोक्ती केली. पण हे युद्ध कधी संपेल हे मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना सांगता आले नाही. आता इराणमधील उरल्यासुरल्या नेत्यांनी शस्त्र ठेवून शरणागती पत्करावी, हेच त्यांच्या हिताचे आहे असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
माझे काही आडाखे आहेत. जोपर्यंत आवश्यक आहे तोपर्यंत युद्ध सुरूच राहील. इराणवर कारवाई आवश्यक होती. ते उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांचा देश संपूर्ण कोलमडला आहे. फक्त मी युद्धबंदीचा कालावधी सांगू शकत नाही.
Comments are closed.