पायलटच्या रेस्क्यू ऑपरेशनची गुप्त माहिती लीक करणाऱ्या फितुराचा शोध सुरू; डोनाल्ड ट्रम्प यांचे पित्त खवळले, पत्रकारालाही दिली धमकी
इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन हवाई दलाच्या जवानाला वाचवण्याच्या अत्यंत संवेदनशील मोहिमेची माहिती लीक झाल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पित्त खवळले आहे. अमेरिकन प्रशासनात कुणीतरी फितूर सक्रिय असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. तसेच या मोहिमेबाबत बातमी देणाऱ्या पत्रकाराने त्याचे सूत्र उघड करावेत अन्यथआ तुरुंगवास भोगण्यासाठी तयार रहावे, अशी धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे.
इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये 28 फेब्रुवारीपासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धा दरम्यान अमेरिकेचे एफ-15ई हे लढाऊ विमान इराणने पाडले होते. यातील एक पायलट सुखरूप बाहेर पडला, तर दुसरा इराणच्या भूमीवर अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी अमेरिकेने अत्यंत गुप्त मोहीम राबवली होती. मात्र ही मोहीम सुरू असताना एका संस्थेने त्याबाबत माहिती दिली आणि इराणला याचा सुगावा लागला. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला. या मोहिमेमबाबत माहिती देताना त्यांनी गुप्त माहिती लीक करणाऱ्याचा समाचार घेतला.
इराणमध्ये अडकलेल्या पायलटच्या रेस्क्यू ऑपरेशनची माहिती लीक करणाऱ्या फितुराचा आम्ही शोध घेत आहोत. त्या व्यक्तीमुळे ही मोहीमच संकटात सापडली नाही, तर इराणमध्ये अडकलेल्या जवानाच्या जीवालाही यामुळे धोका निर्माण झाला होता, असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. तसेच ज्या पत्रकाराने ही बातमी पहिल्यांदा दिली त्याने आपला स्त्रोत उघड करावा. अन्यथा त्याला तुरुंगात जावे लागेल, असा गर्भित इशाराही ट्रम्प यांनी दिला. तसेच जोपर्यंत तो स्त्रोत उघड करत नाही तोपर्यंत त्याला तुरुंगातच रहावे लागेल, असा सज्जड दमही त्यांनी दिला.
व्हिडिओ | ऑपरेशन एपिक फ्युरीवर अपडेट करत आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (@realDonaldTrump) म्हणतात, “गेल्या 37 दिवसांत, अमेरिकेच्या सशस्त्र दलांनी इराणवर 10,000 हून अधिक लढाऊ उड्डाणे केली आहेत, ज्याचे ऐकले नाही. 13,000 हून अधिक लक्ष्यांवर हल्ला केला आहे. आम्ही गेल्या आठवड्यात गमावलेला F-15 होता… pic.twitter.com/D7DD8qjlRm
— प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@PTI_News) 6 एप्रिल 2026
Comments are closed.