…म्हणून हिंदुस्थानवरील आयात शुल्क दुप्पट केले, रशियाचा उल्लेख करत व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीचा मोठा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धात मध्यस्थी करण्यात व्यस्त आहे. नुकतीच त्यांनी अलास्का येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करत त्यांच्याशी चर्चा केली. आता ते पुतिन आणि झेलेन्स्की यांची भेट घडवून आणणार आहेत. याच दरम्यान रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने हिंदुस्थानला कोंडीत पकडल्याचे समोर आले आहे. रशियावर अप्रत्यक्ष दबाव आणून युक्रेन सोबत सुरू असलेली युद्ध थांबवण्यासाठी हिंदुस्थानवर अतिरिक्त आयात शुल्क लादल्याचे हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी स्पष्ट केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला हिंदुस्थानवर 25 टक्के आयात शुल्क लादले होते. त्यानंतर हे आयात शुल्क 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले. या दरम्यान ट्रम्प यांनी हिंदुस्थान रशियाकडून तेल आयात करून त्यांना युक्रेन सोबत युद्धासाठी अप्रत्यक्षरीत्या मदत करत असल्याचा उल्लेखही केला होता. आता यावर व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी मोठे विधान केले. रशियाशी व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांवर आणि रशियावर दबाव आणण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे लेव्हिट यांनी सांगितले.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असेल युद्ध थांबवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचंड दबाव निर्माण केला. हिंदुस्थानवर लादलेले निर्बंध आणि itra कारवाई याचेच उदाहरण आहे. ट्रम्प यांना हे युद्ध लवकरात लवकर थांबवायचे असून रशियावर दबाव निर्माण करण्यासाठी हिंदुस्थानवर दुय्यम कर लादण्याची तयारी तयारीही केली होती असेही लेव्हिट यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
ट्रम्प प्रशासन सध्या रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी चर्चा करून द्विपक्षीय भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे, असेही व्हाईट हाऊसने स्पष्ट केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या शांततेच्या प्रयत्नांमुळेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट झाली आणि त्यानंतर अवघ्या 48 तासात युरोपियन नेतेही व्हाईट हाऊसला आले. तसेच जो बायडडेन यांच्या जागी ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असते तर रशिया-युक्रेन युद्ध झालेच नसते. पुतिन यांनी हे मान्य केल्याचे लेव्हिट पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर म्हणाल्या.
पुतिन-ट्रम्प भेटीमुळे हिंदुस्थान गॅसवर; अमेरिका-रशिया संबंध सुधारल्यास टेन्शन
दरम्यान, लेव्हिट यांनी हिंदुस्तान-पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापाराचा प्रभावीपणे वापर केला. व्यापार अस्त्र वापरून त्यांनी हे युद्ध थांबवले असेही त्या म्हणाल्या. ट्रम्प यांनीही आतापर्यंत 30 हून अधिक वेळा युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. मात्र मोदी सरकारने हा दावा फेटाळून लावत कोणत्याही परकीय हस्तक्षेपास नकार दिला आहे.
Comments are closed.