ठराविक प्रक्रियेप्रमाणे हिंदुस्थान रशियाकडून तेलखरेदी कमी करणार! ट्रम्प यांचा पुन्हा दावा

हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी कमी करणार असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच केला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा या दाव्याचा पुनरुच्चार करत एका ठराविक प्रक्रियेनुसार हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी कमी करणार असल्याचा दावा केला आहे. तेल खरेदी कमी करण्याचा निर्णय झाल्यावर लगेच त्याप्रमाणे कार्यवाही करता येत नाही. ही एक प्रक्रिया आहे आणि त्यानुसारच हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी कमी करणार असल्याचे ते म्हणाले.

हिंदुस्थान आता रशियाकडून तेल खरेदी कमी करण्यासाठी पावले उचलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या त्यांच्या संभाषणाचा संदर्भ देत ट्रम्प म्हणाले की हिंदुस्थान वर्षाच्या अखेरीस रशियाकडून सुमारे ४० टक्के कमी तेल खरेदी करेल. त्यांनी हिंदुस्थानच्या या निर्णयाचे कौतुकही केले. या निर्णयामुळे रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी रशियावर दबाव येणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी चीनसोबतचे संबंध सुधआरण्यावरही भर दिला. ते म्हणाले चीन आणि रशियामधील मैत्री कधीपर्यंत टिकेल, हे सांगता येत नाही. ट्रम्प यांचे विधान थेट जागतिक तेल बाजाराशी आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या राजकारणाशी जोडलेले आहे. ते म्हणाले की रशिया आणि चीनमधील मैत्री, जी सध्या मजबूत दिसते, ती खरी नाही. ही मैत्री अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा आणि माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या धोरणांमुळे दोन्ही देश जवळ आले.रशिया आणि चीनमधील संबंध जबरदस्तीचे आहेत. मात्र, अमेरिका चीनमध्ये शांतता आणि सकारात्मक सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रशिया आणि चीनमधील संबंध आणखी मजबूत झाले तर ते जगातील धोरणात्मक संतुलन बदलू शकते. ट्रम्प त्यांच्याशी झालेल्या बैठकीत शी जिनपिंग यांच्याशी थेट या विषयावर चर्चा करू इच्छितात आणि युद्ध संपवण्यासाठी तेल आणि उर्जेशी संबंधित उपाय शोधू इच्छितात. त्यांना विश्वास आहे की शी यावर उघडपणे चर्चा करू शकतात.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की ते पुढील आठवड्यात मलेशिया, दक्षिण कोरिया आणि जपान या तीन देशांचा दौरा करत आहेत. त्यांनी सांगितले की, दक्षिण कोरियाच्या त्यांच्या भेटीदरम्यान ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. त्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

ट्रम्प यांनी सांगितले की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी त्यांची भेट रद्द करण्यात आली आहे. ते म्हणाले, मला वाटले की ही भेट यावेळी योग्य ठरणार नाही. आपण ज्या ध्येयापर्यंत पोहोचायला हवे होते त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही, म्हणून मी बैठक रद्द केली, असे त्यांनी स्पष्ट केले. रशिया -युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी हिंदस्थानने रशियाकडून तेल खरेदी हळूहळू कमी करावी अशी अमेरिकेची इच्छा आहे. ट्रम्पच्या विधानावरून स्पष्ट होते की अमेरिका आता मदतीसाठी पुन्हा हिंदुस्थानकडे वळला आहे.

हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे थांबवली नाही, तर हळूहळू कमी करत आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत रशियाकडून तेल आयातीत थोडीशी घट झाली होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नायरा एनर्जी सारख्या खाजगी कंपन्यांनी पुन्हा खरेदी वाढवली. दरम्यान, सरकारी मालकीच्या रिफायनर्सनी खरेदी थोडी कमी केली. यावरून असे दिसून येते की हिंदुस्थान सावधगिरीने पुढे जात आहे. ते स्वस्त तेल मिळवत आहे आणि जागतिक दबाव व्यवस्थापित करत आहे. तेल हे केवळ ऊर्जा नाही, तर हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे. म्हणून, हिंदुस्थान आपल्या हितसंबंधांशी तडजोड करण्याच्या मनःस्थितीत नाही.

Comments are closed.