स्वर्गात जाण्याची माझी तयारी नाही; निराश झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खदखद

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीत स्वतःचेच घोडे पुढे दामटत होते. मात्र, त्यांना नोबल मिळाले नसल्याने ते निराश झाले आहेत. यातून त्यांनी जगाची चिंता वाढवणारे निर्णय घेतले आहेत. त्यांनी चीनवर 100 टक्के टॅरिफ लादला आहे. तसेच या नैराश्यातूनच त्यांनी आणखी एक वक्तव्य केले आहे. स्वर्गात जाण्याची माझी तयारी नाही. मी स्वर्गात जाणार नाही. स्वर्ग माझ्यासाठी बनलेला नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. तेल अवीवला जाताना त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. जगात शांततेसाठी आपण करत असलेले प्रयत्न किंवा इतर कोणतेही कार्य आपल्याला स्वर्गात नेऊ शकत नाही. स्वर्गात जाण्याची माझी तयारी नाही. मी स्वर्गात जाणार नाही. स्वर्ग माझ्यासाठी बनलेला नाही. मात्र, तरीही जगात शांतता प्रस्थापित करण्याचे आपले प्रयत्न सुरूच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांनी गाझा शांतता करार आणि मध्य पूर्वेतील परिस्थितीबाबतही मत व्यक्त केले. ट्रम्प म्हणाले की हा करार माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे ऑपरेशन असू शकतो, असे ते म्हणाले. या कराराअंतर्गत हमासच्या ताब्यातील 20 ओलिसांना सोडण्यात येईल. ओलिसांना अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना सोडवणे कठीण होते. गाझाच्या उभारणीबाबत ट्रम्प म्हणाले की, प्रथम, लोकांची काळजी घेतली जाईल, त्यानंतर त्यांचे आश्रयस्थान आणि उभारणीचे काम लगेच सुरू केले जाईल. आगामी काळात तेथे शांतता आणि विकास अशी दोन ध्येय असतील, असेही त्यांनी सांगितले. आखाती देशात शांतता प्रस्थापित करणे हे सरकारी शटडाऊन संपवण्यापेक्षा कठीण आहे. हा संघर्ष सुमारे ३,००० वर्षांपासून सुरू आहे, तर शटडाऊन हे फक्त १० दिवसांचे होते.
तुम्ही युक्रेनमधील युद्ध संपवण्याची आशा करत आहात कारण ते तुम्हाला स्वर्गात पोहोचण्यास मदत करू शकेल, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत प्रश्न विचारला असता ट्रम्प म्हणाले की, जगात शांततेसाठी आपण करत असलेले प्रयत्न किंवा इतर कोणतेही कार्य आपल्याला स्वर्गात नेऊ शकत नाही. स्वर्गात जाण्याची माझी तयारी नाही. मी स्वर्गात जाणार नाही. स्वर्ग माझ्यासाठी बनलेला नाही.त्यांच्या या वक्तव्याची सोशल मिडीयावर चर्चा होत आहे.
Comments are closed.