बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं नुकसान झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत तब्बल 9800 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. ट्रम्प यांची नेटवर्थ 1.1 अब्ज डॉलर्सनं घसरण झाली आहे. याचं प्रमुख कारण क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये झालेली घसरण होय. प्रामुख्यानं बिटकॉईन क्रॅश झाल्यानं ट्रम्प यांना फटका बसला आहे.
डंडंड ट्रंप : डोनाल्ड ट्रम्प : संकटाचा मोठा भटका
फोर्ब्सच्या नव्या रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती 6.2 अब्ज डॉलर्स झाली आहे. जी यापूर्वी सप्टेंबर महिन्यात संपत्ती 7.3 अब्ज डॉलर्स होती. म्हणजेच ट्रम्प यांच्या संपत्तीत 1.1 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. रिपोर्टनुसार ट्रम्प यांची कंपनी टीएमटीजीच्या सेअरमध्ये घसरण झाली आहे. ही कंपनी डीजेटी टिकरनुसार व्यवसाय करते.
गेल्या शुक्रवारी बिटकॉईनसह इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं टीएमटीजी स्टॉकमध्ये 10.18 डॉलर्सची घसरण झाली. ट्रम्प यांच्या कंपनीच्या शेअरमध्ये काही दिवस घसरण होत आहे. ट्रम्प मीडिया अँड टेक्नोलॉजी ग्रुपचे सेअर गेल्या एक महिन्यात 35 टक्क्यांनी तर सहा महिन्यात 55 टक्क्यांनी घसरले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत सप्टेंबर 2025 पर्यंत मोठी वाढ पाहायला मिळत होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत 3 अब्ज डॉलर्सची वाढ झाली होती. त्यामुळ डोनाल्ड ट्रम्प फोर्ब्सच्या अमेरिकेतील 400 श्रीमंत लोकांच्या यादीत पोहोचले होते. ट्रम्प यांनी 201 क्रमांक मिळाला होता. आता ट्रम्प यांच्या संपत्तीत 1.1 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे.
रिपोर्टनुसार ट्रम्प यांच्या संपत्तीतील वाढीचं कारण त्यांच्या कुटुंबानं क्रिप्टोमध्ये केलेली गुंतवणूक हे होतं. फोर्ब्सनुसार ट्रम्प आणि त्यांची तीन मुलं वर्ल्ड लिबर्टी फायनान्शिअलचे सह संस्थापक म्हणून लिस्ट करण्यात आलं होतं. या विकेंद्रीत फायनान्शिअल प्लॅटफॉर्मला सप्टेंबर 2024 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. कंपनीनं 100 अब्ज डॉलर्सचे WLFI टोकन बनवले होते त्यापैकी 22.5 अब्ज टोकन डीटी मार्क्स डीईएफआई एलएलसीला देण्यात आले होते. या कंपनीत ट्रम्प यांची जवळपास 70 टक्के भागिदारी होती. $ WLFI टोकन लाँच झालं तेव्हा त्याचं मूल्य 0.31 डॉलर्स होतं ते आता 0.158 डॉलर्सवर आलं आहे.
नोव्हेंबर महिन्यातील सुरुवातीला सिक्यूरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे टीएमटीजीनं केलेल्या फायलिंग नुसार तिसऱ्या तिमाहीत त्यांचं नुकसान 54.8 मिलियन डॉलर्स इतकं होतं. कंपनीच्या बिटकॉईन होल्डिंग्जमध्ये 48 मिलियन डॉलर्सची घसरण झाली आहे.
बिटकॉईनच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरल्या आहेत.6 ऑक्टोबरला एका बिटकॉईनची किंमत 125000 अमेरिकन डॉलर इतकी होती. त्यात 30 टक्क्यांची घसरण होऊन ते 86174 डॉलरवर आली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.