… तर आता जितकं टॅरिफ आहे त्यापेक्षा अधिक लावू, डोनाल्ड ट्रम्प यांची इतर देशांना नवी धमकी

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममधील टॅरिफ संदर्भातील आक्रमक भूमिका सोडलेली नाही. ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेली टॅरिफ सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर ठरवून देखील त्यांनी नरमाईचं धोरण स्वीकारण्यास नकार दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व देशांवर 15 टक्के टॅरिफ लादलं आहे. या दरम्यान ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रथ सोशल या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करुन जगातील विविध देशांना इशारा दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की कोणत्याही देशानं अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या हास्यास्पद निर्णयाचा आधार घेत खेळ करण्याचा प्रयत्न केला तर, प्रामुख्यानं ज्या देशांनी अमेरिकेला कित्येक दशकं फसलवलं आहे. त्यांच्यावर आता आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीनं टॅरिफ लादेन. खरेदीदारांनी सावध राहावं, याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, असं ट्रम्प यांनी म्हटलं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या पोस्टनंतर आणखी पोस्ट करत म्हटलं की टॅरिफला मंजुरी घेण्यासाठी त्यांना पुन्हा अमेरिकन काँग्रेसकडे जाण्याची गरज नाही. त्यांनी ती वेगवेगळ्या रुपात अगोदरच घेतलेली आहे.

अमेरिकेचं भारतावर टॅरिफ किती?

भारत आणि अमेरिका यांच्यात काही दिवसांपूर्वी व्यापार कराराची घोषणा करण्यात आली होती. त्या घोषणेनुसार अमेरिकेनं भारतावर 18 टक्के टॅरिफ लादलं होतं. यापूर्वी अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ आणि रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं 25 टक्के असं एकूण 50 टक्के टॅरिफ लादलं होतं. भारतानं रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यानंतर ट्रम्प यांनी भारतावर दंड म्हणून लावलेलं टॅरिफ कमी केलं. भारतावरील टॅरिफ 25 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर आणलं. यानंतर अमेरिकन सुप्रीम कोर्टानं ट्रम्प यांनी लादलेली टॅरिफ बेकायदेशीर ठरवली. यानंतर संतापलेल्या ट्रम्प यांनी अमेरिकन सुप्रीम कोर्टावर टीका केली. सुप्रीम कोर्टानं टॅरिफ बेकायदेशीर ठरवल्यानंतर काही तासांमध्ये ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. आता ट्रम्प यांनी सर्व देशांवर 15 टक्के आयात कर लादणार असल्याटं म्हटलंय.

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफमधून अमेरिका जी कमाई करेल त्या कमाईचा काही भाग अमेरिकन नागरिकांना देणार असल्याचं देखील जाहीर केलं होतं.  विविध देशांवर टॅरिफ लादून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत उत्पादन वाढीवर जोर देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.