ट्रम्प यांची नवी खेळी! पुतिन, जिनपिंग यांचे केले कौतुक; या चतुर नेत्यांसोबत व्यापार करार कठीण असल्याचे केले स्पष्ट

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला झुकवण्यासाठी आणि चीनला आपल्या बाजूने वळवण्यासाठी आता नवी खेळी केल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की दोन्ही नेते खूप सामर्थ्यवान आणि बुद्धिमान आहेत. ते दोघे असे नेते आहेत ज्यांच्याशी खेळता येत नाही. त्यामुळे या चतुर नेत्यांसोबत व्यापार करार करणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन आणि जिनपिंग यांचे कौतुक केल्याने जगाचे लक्ष याकडे वेधले गेले आहे. त्यामुळे याबाबत अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत. अनेकजण यामागे ट्रम्प यांची खेळी असल्याचे मत व्यक्त करत आहेत. दोन्ही नेते अत्यंत बुद्धिमान आहेत आणि त्यांची मते वळवणे कठीण आहे. शी जिनपिंग यांना भेटल्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त केले.
पुतिन किंवा शी जिनपिंग यांच्यापैकी कोणाशी सामना करणे जास्त कठीण आहे असे विचारले असता ट्रम्प म्हणाले की, दोघांपैकी कोणत्याही नेत्याशी सामना करणे सोपे नाही. दोघेही खूप सामर्थ्वान नेते आहेत. दोघेही बुद्धिमान आहेत. ते खूप सामर्थ्यवान नेते आहेत. हे असे लोक आहेत ज्यांच्याशी कोणतीही खेळी करता येत नाही. त्यांना खूप गांभीर्याने घेतले पाहिजे. त्यांच्यावर कोणतेही विचार लादणे कठीण आहे, असेही ते म्हणाले.
युक्रेन-रशिया युद्धाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी माजी अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांना यासाठी जबाबदार धरले आणि ते म्हणाले, माझ्या प्रशासनात असे युद्ध कधीच घडले नसते. हे युद्ध माझ्या प्रशासनात कधीच घडले नसते. पुतिन यांनी स्वतः असे म्हटले होते. जो बायडेन अध्यक्ष असल्याने हे युद्ध घडले. ट्रम्प यांनी दावा केला की त्यांच्या पहिल्या कार्यकाळात असा कोणताही तणाव निर्माण झाला नाही. चार वर्षे काहीही घडले नाही. कोणीही असे काही घडू शकते असे वाटलेही नव्हते. मी माझ्या पहिल्या कार्यकाळात आमचे सैन्य मजबूत केले. आम्ही जगातील सर्वोत्तम शस्त्रे बनवतो.
शी जिनपिंग यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, आमचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. ते एक सामर्थ्यवान व्यक्ती आहेत, खूप प्रभावशाली नेते आहेत. कोरोना महामारीमुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते हे त्यांनी मान्य केले. ते असेही म्हणाले की, आमचे संबंध अजूनही शक्य तितके चांगले आहेत. दोन्ही देश एकमेकांचा समान आदर करतात.हे संबंध महत्त्वाचे आहेत कारण दोन्ही देश शक्तिशाली आहेत.

Comments are closed.