‘एपस्टीन’वरून आरोप होताच ट्रम्प बिथरले, माझा संबंध नाही म्हणत विरोधक आणि माध्यमांना धमकावले
अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणारा जेफ्री एपस्टीन याच्यावर चाललेला खटला व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव समोर आले आहे. यावरून ट्रम्प यांना विरोधकांनी लक्ष्य केले आहे. त्यावरुन ट्रम्प हे भडकले आहेत. या प्रकरणावर त्यांनी प्रथमच भाष्य करून विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. लैंगिक गुह्यातील आरोपी जेफ्री एपस्टीनचा वापर करणाऱ्यांनीच त्याला वाऱयावर सोडून दिले. आज तेच लोक माझ्यावर आरोप करत आहेत, असे ट्रम्प यांनी ‘टथ’ या सोशल मीडिया साईटवर एका संदेशात म्हटले असून हा तुमचा शेवटचा मेरी ख्रिसमस असेल, आनंद घ्या, असा इशाराही दिला आहे.
ट्रम्प यांनी नाताळनिमित्त ‘टथ’ या सोशल मीडियावर संदेश दिला. त्यात त्यांनी माध्यमांसह टीकाकारांना उत्तर दिले. ते म्हणाले की, जेफ्री एपस्टीनचा ज्यांनी वापर केला, त्याच्या पाटर्य़ांचा आनंद लुटला त्याच लोकांनी नंतर त्याला वाऱयावर सोडून दिले. आज तेच लोक माझ्यावर आरोप करत आहेत. त्याला पैशांचे गठ्ठे पुरवणारे, त्याच्या खासगी बेटावर जाणारे आणि त्याला पृथ्वीवरील सर्वात महान माणूस मानणाऱयांना शुभेच्छा. हे सर्व घाणेरडय़ा मानसिकतेचे आहेत. माध्यमांकडूनही खोटय़ा बातम्यांना महत्त्व दिले जात आहे, मात्र हा तुमचा शेवटचा मेरी ख्रिसमस असेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचे नाव अनेक वेळा आले आहे. 1993 ते 1996 या कालावधीत ट्रम्प यांनी एपस्टीनच्या खासगी विमानातून आठ वेळा प्रवास केल्याचा उल्लेख समोर आला आहे.
मी तेव्हाच संबंध तोडले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टीन याच्याशी असलेल्या संबंधांबाबतही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, तो एक घृणास्पद व्यक्ती असून माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्याला सोडून देणारा मी एकमेव व्यक्ती आहे. तो प्रसिद्ध आणि फॅशनेबल होण्याच्या खूप आधीच मी त्याच्याशी संबंध तोडले होते, विरोधी डेमोव्रॅटिक पक्षातील लोकांची या प्रकरणात नावे उघड होतील त्यावेळी त्यांना याबाबत बरेच स्पष्टीकरण द्यावे लागेल, असा दावा ट्रम्प यांनी केला.
Comments are closed.